“व्यक्ती तितक्या प्रवृत्ती”
जीवनाच्या प्रवासात आपण
अनेक माणसांन सोबत जोडले जातो. काही स्वत:हून जोडली जातात... काहिं सोबत आपण स्वत:हून
जोडले जातो...तर काही चुकून हि जोडली जातात. प्रत्येक नात्याचा एक वेगळा रंग असतो
वेगळा ढंग असतो...काही माणस म्हणजे पदरी पडल आणि पवित्र झाल तर काही म्हणजे दुधात साखर!!!! या प्रत्येक नात्याला आपण एक सुंदर नाव देतो. रक्ताच्या नात्यांची
नाव हि प्रत्येकाच्या आयुष्यात समानच असतात. पण रक्ताने न जोडलेल्या नात्यांना नाव
मात्र आपण देतो. त्यातही काही अशी नाती असतात ज्यांना नेमक काय नाव द्याव हे शेवट
पर्यंत कळत नाही.
विविध रंगी या नात्यांमध्ये
अशीच काही माणस भेटली.आयुष्याच्या न थांबणाऱ्या या अखंड प्रवासात अनेक माणस
भेटली..प्रत्येक जण वेगळाच होता..कोणाची तुलना कोणाशी करूच नये असा...
कोणी दुखाचे
अश्रू..........स्वतः दूर जाऊन
काहींनी मेणबत्ती बनून
जीवनातला अंधार दूर केला....स्वतः अस्तित्व संपवून...
तर काहींनी वात बनून स्वतः
जाळून माझ्या आयुष्यात प्रकाश आणला........
काहीनी क्षणोक्षणी इतक जाळल
सुद्धा कि जीव होरपळून निघावा...
काही माणस नारळासारखी सारखी
बाहेर कठोर तर आतून सौम्य भासली. काही तर काराल्यासारखी कडू सुद्धा होती..पण
पौष्टिक होती..ज्यांनी केवळ निंदाच केली .... काही मोदका सारखी बाहेरून बेचव पण
आतून खूपच गोड सुद्धा भेटली.
काहींनी पिंपळ बनून
आयुष्यभर पुरेल इतकी आत्मविश्वासाची सावली दिली..जेव्हा कधी आयुष्यात निराशा आलीच
तर त्यांची सावली कायम आधार देईल. काही गुलाबा प्रमाणे आकर्षक सुद्धा भेटली पण काट्यामधून
त्यांच्या पर्यंत पोचण खूपच अवघड सुद्धा झालं.
काही अगदीच खास होती Dairy milk सारखी....जितकी melt झाली
तितकीच हवी-हवीशी वाटली...ज्यांचा सहवास इतका आल्हाददायक भासला कि संपल्यावरही
कागद जपून ठेवावा असा....
अर्थात अस म्हणता येईल कि या विविध रंगी नात्यांनीच आयुष्य रंगीत आहे...त्यातला प्रत्येक रंग तितकाच महत्वाचा आहे!!!