Wednesday, 13 September 2017

नात्यांमधली भावनिक acidity .............!!!!



नात्यांमधली acidity .............!!!!

SAD साठी प्रतिमा परिणामऐकायला थोडं चुकीचं वाटेल..........मला सुद्धा लिहताना .......विचार करताना थोडं कठीण वाटलं होतं.पण आज एक मैत्रीण सहज म्हणाली "तो म्हणाला acidity सारख नात नको आहे मला". ऐकून थोडं हसायला आलं पण ते एक वाक्य मनात घर करून गेलं.
मना सारख जेवण बनवून जेवलो तरी acidity होते तेव्हा अस वाटत उगाच जेवलो एवढं.मग आधी आवडीचं जेवलेलं जीरलेलं नसतं आणि नंतर ही मना सारख खाता येत नाही...कारण acidity!!!
आयुष्यात असंख्य नाती जपताना असंच काहीसं होत असत अस नाही का वाटत?....प्रत्येक नात आपल्या जागी योग्यच असत पण आपण ते कोणत्या दृष्टीने घेतो त्यावर ते अवलंबून असत. जेवण बनवता घेतलेल्या सर्वोत्तम मेहनती वर एक acidity पाणी फिरवते. अगदी तसच नात जुळतात कितीही काळजी घ्या पण जपताना अविसश्वासाची acidity नात टिकू देत नाही.

कधी कधी घरी खूप छान जेवण असूनही आपण मात्र बाहेर जेवायला जातो..अर्थात गरज सते पण मस्ती असते.अश्या वेळी जेव्हा acidity होते तेव्हा आपण म्हणतो उगाच बाहेर गेलो..
आयुष्यात आहेत ती नाती जपता नवीन नाती जोडताना असच काहीस होत अस नाही का वाटत????
स्वतःच्या भावना जपताना दुसर्याला ही भावना आहेत याचा विचार नाही केला तर ही कृतघ्नतेची भावनांची acidity तुम्हाला अस्वस्थ करते...
RESTURANT INDIAN COUPLE HAPPY साठी प्रतिमा परिणामकधी कधी जेवणच रुचकर नसत पण तुम्ही मात्रमनापासून पासून जेवता तेव्हा सुद्धा acidity होऊ शकते मात्र तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही कारण तुम्हाला मनापासून जेवायचं असतं....अगदी तसंच काही नात्यानं मध्ये स्वतःला कितीही त्रास झाला तरीही तूम्ही दाखवत नाही कारण तुम्हाला ते मनापासून हवं असत....
कधी कधी आपण आपल्या मनासारखं नाही पण दुसर्याला आवडेल अस जेवण बनवतो किंवा त्याच्या आवडीच ऑर्डर करतो. पण तरीही आपण मनापासून आस्वाद घेतो. कारण तिथे समोर कोण आहे हे महत्वाच असतं. अगदी तसच.... काही नाती तुम्ही तुमची नाही पण समोरच्याची आवड निवड बघून जोडता...आणि ती नाती जपताना स्वतः पेक्षा समोरच्याची जास्त काळजी घेता...इथे दुखः...भीती...परकेपणा दुर्लक्ष अश्या भावनांच्या acidity चा त्रास झालाच तरी जाणवत नाही...
काही माणसांना कधीच acidity होत नाही कारण त्यांना स्वतःची काळजी स्वतः घेता येते...जेव्हा तुमची काळजी दुसर्याने घ्यावी अशी अपेक्षा असेल किंवा परिस्थिती असेल तेव्हा तुम्हाला ही नात्यानं मधली परावलंबीत्वाची acidity होते कारण जेव्हा तुमची काळजी घेणारी व्यक्ती थोडं जरी कमी-जास्त वागली तरी त्रास तुम्हालाहोतो....तीला नाही!
BREK UP साठी प्रतिमा परिणामतुम्हाला माहीतच असेल कायमच acidity  होणाऱ्या माणसांना डॉक्टर काही गोष्टी कायमच्या बंद करायला सांगतात...अगदी काही नात्यानं मध्ये जेव्हा कधीही संपणारी अंतरे निर्माण होतात तेव्हा त्यांना पूर्णविराम द्यावाच लागतो..आणि तेव्हा होते घटस्पोट BREAK UP वादविवाद भांडण इर्शा यांची ACIDITY......आणि मग तेव्हा तुम्हाला कितीही वाटत तरी तुम्ही ते नात टिकाऊ शकत नाही म्हणूनच आधी पासूनच काळजी घ्या कारण बंद झालेली खाती पुन्हा उघडता येत नाहीत.... किंबहुना उघडूच नये....!!!
असंख्य भावना एकत्र जपताना मनाची होणारी अस्वस्थता..चलबिचल...ओढाताण आपण टाळू शकत नाही....पण त्यातून होणारा त्रास हा असह्य होतो तेव्हा मग दही भातावर भागवून किंवा ENO पिऊन जशी acidity दूर करावी लागते ना तसच नात्यामध्ये हि प्रेम, विश्वास ,भेट ,संवादाचा ENO च परिणामकारक असतो....
LOVE COUPLE साठी प्रतिमा परिणामभावनांची acidity अधून मधून होणारच पण तेव्हा स्वतःला आणि समोरच्याला सावरायला माणुसकीचा ENO कायम सोबत ठेवावा लागेल.....तेव्हाच तुमच्या नात्यामधल निरामय स्वास्थ्य जपू शकाल....आणि या नात्यांमधल्या भावनिक ACIDITY पासून स्वतःला आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला दूर ठेवू शकाल!!!!