एक चार अक्षरी शब्द पण दोन माणस दोन मनांना जोडणारा.आजकाल सगळंच online झालंय.सण साजर करण सुद्धा ...तिळगुळ घेणं देणं सारंच. पण जे online जुळलंय आणि online दुरावलंय अश्या नात्यांना या social networking वरील शुभेच्छा सुद्धा स्वीकारण्याची सहज सवय झाली आहे.भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत या सणाला एक अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या काळात नात जोडणं आणि तोडणं खूप साधं सोप्प झालाय आणि महत्वाचं म्हणजे तोडण्यासाठी कायद्याचा आधार मिळतो या पेक्षा खंत कोणती असू शकते. पण ते टिकवणं त्याला जपणं सांभाळणं कुठे तरी हरवलंय किंवा कोण जातंय या पेक्षा नवीन कोण येतंय याला आपण महत्व देतोय…नाती कधी तुटली नसती पण नात जोडण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने असतो पण टिकवण्यासाठी एक तर्फी असतो म्हणून माणस दुरावतात….
उणिवा तर प्रत्येकात असतात पण उणीवा भरून काढणारा आणि त्या सहित तुम्हाला स्वीकारणार कुणी तरी कायमस्वरूपी असावं लागतं. कोणताही तीलगुळ रोज न देता घेता रोज तुमच्याशी गोड बोलणारी तुमची आई,पत्नी, मैत्रीण किंवा बाबा, भाऊ, पती किंवा मित्र यांना आजच्या दिवशी आवर्जून तिळगूळ द्या. तुमच्या ऑफिस मधले तुमचे सहकारी कामासाठी का होईना पण रोज हसून बोलतात त्यांना तिळगुळ द्या. सर्वात महत्वाचे तुमचे शेजारी न बोलता न सांगता तुमच्या वर कायम लक्ष ठेवतात त्यांना तिळगुळ घ्या कारण त्यांच्या गोड असण्यावरच तुम्ही ऑफिस मध्ये निश्चिंत असता.
फक्त social media वर शुभेच्छा देण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा भरणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा शब्दांचा स्नेह आणि गोडवा देऊया आणि खऱ्या अर्थाने मकरसंक्रांत या सणातील नात्यांमधील सकारात्मक संक्रमण करूया.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं मग ते व्यक्ती सोबत असो की समाज राष्ट्र किंवा देशा सोबत एक नागरिक म्हणून असणार असो त्या मध्ये असणारा स्नेह आणि गोडवा वाढवूया त्यासाठी स्वतः पासून सुरुवात करूया!!!!!
मकर संक्रांतीच्या स्नेहमयी आणि गोड गोड शुभेच्छा !!