सुहृद
Wednesday, 18 July 2018
Thursday, 7 June 2018
हरवलंय की गमावलय ???
आयुष्यात
काहीच हरवलं नाही आणि गमावलं नाही अस कोणीच नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात
अस काहींना काही असतंच जे हरवलंय किंवा गमावलय.
हरवलेले
शोधावं लागत आणि गमावलेलं
मिळवाव लागत.
हरवलेले
शोधून मिळेल ही कदाचित कारण जे हरवलंय ते जर दुसर कोणाला मिळालं असेल तर तो
तुम्हाला देईल ही कदाचित किंवा जर कोणाला मिळालं नसेल तर ते जिथे हरवलंय तिथेच
तुम्हाला मिळेल..पण गमावलेल पुन्हा मिळेल का??
ज्याने
गमावलंय त्याला ते मिळवायचं का यावर अवलंबून आहे असं म्हणता येणार नाही..कारण जे
गमावलंय ते दुसर कोणाला मिळाल असेल तर तुम्हाला पुन्हा नाही मिळणार...आणि
गमावलेल्याला त्याचं दुःख नसेल तर ते तुम्हाला मिळणार सुद्धा नाही.
......पण कधी कधी हरवलेलं खूप
दिवस मिळालं नाही की आपण विसरून जातो किंवा तसंच काही तरी नवीन घेतो पण तरिही जे
हरवलंय ते विसरणं सोप्प नसतं ना?
अगदी
तसंच गमावलेल सुद्धा पुन्हा मिळवता नाही आलं म्हणून आपण नवीन तसंच काही तरी शोधतो
आणि समजावतो स्वतःच्या मनाला .....मग ती गमावलेली नोकरी असो की माणस त्या शिवाय
जगायचं म्हणजे तडजोड करतोच आपण!!!!
आपले
१००० रु. हरवले म्हणून आपल्याला कोणी २००० दिले तरी आपण आपले १००० रु. नाही विसरू
शकत. अगदी तसच आयुष्यात काही माणस आपण आपल्या किंवा त्यांच्या समज -गैर समज यामुळे
गमावतो पण त्यांची कमी भरून काढणार कोणीही आल तरी त्यांची कमी जाणवतेच.
कधी
कधी गमावलेल्या किंवा हरवलेल्या वस्तू किंवा माणसं त्या पेक्षा दुपट्ट काही तरी
आयुष्यात येत आणि जून सार काही आपण विसरतो.पण आयुष्याच्या एका दुसऱ्या वळणावर ते
पुन्हा भेटतात तेव्हा प्रश्न असतो की स्वीकारावं की नाही ??
कारण
मधल्या काळात झालेल्या बदला सहित त्यांना स्वीकारणं खूप कठीण असतं. जस कि वस्तू
जुन्या झालेल्या असतात ..….म्हणून वाटत हरवलेलं असो की गमावलेल पुन्हा मिळावं पण
जस च्या तस! जे कदाचितच शक्य असेल.
आपण फक्त
वस्तू किंवा माणसच गमावतो असं नाही .कधी पानिपतच्या युद्धात विश्वास गमावलाय....तरी
नटसम्राट मध्ये माणुसकी हरवलीये.....कुठे नात्यांच्या गर्दीत भावना हरवल्यात तर
कुठे रुक्ष जीवनात डोळ्यातले अश्रू हरवलेत...!!!!
म्हणून
वाटत जरूर काही तरी हरवाव जे पुन्हा पुन्हा शोधावस वाटेल आणि.. नकळत – कळत गमवाव काहीतरी
आणि जे पुन्हा पुन्हा मिळावसं वाटेल अगदी जसच्या तस.....!!!
तुमच्या आयुष्यात अस काही आहे का जे हरवून मिळालय? किंवा गमावून मिळालंय??
Saturday, 14 April 2018
Saturday, 10 February 2018
Saturday, 13 January 2018
स्नेह आणि गोडवा!!
एक चार अक्षरी शब्द पण दोन माणस दोन मनांना जोडणारा.आजकाल सगळंच online झालंय.सण साजर करण सुद्धा ...तिळगुळ घेणं देणं सारंच. पण जे online जुळलंय आणि online दुरावलंय अश्या नात्यांना या social networking वरील शुभेच्छा सुद्धा स्वीकारण्याची सहज सवय झाली आहे.भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत या सणाला एक अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या काळात नात जोडणं आणि तोडणं खूप साधं सोप्प झालाय आणि महत्वाचं म्हणजे तोडण्यासाठी कायद्याचा आधार मिळतो या पेक्षा खंत कोणती असू शकते. पण ते टिकवणं त्याला जपणं सांभाळणं कुठे तरी हरवलंय किंवा कोण जातंय या पेक्षा नवीन कोण येतंय याला आपण महत्व देतोय…नाती कधी तुटली नसती पण नात जोडण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने असतो पण टिकवण्यासाठी एक तर्फी असतो म्हणून माणस दुरावतात….
उणिवा तर प्रत्येकात असतात पण उणीवा भरून काढणारा आणि त्या सहित तुम्हाला स्वीकारणार कुणी तरी कायमस्वरूपी असावं लागतं. कोणताही तीलगुळ रोज न देता घेता रोज तुमच्याशी गोड बोलणारी तुमची आई,पत्नी, मैत्रीण किंवा बाबा, भाऊ, पती किंवा मित्र यांना आजच्या दिवशी आवर्जून तिळगूळ द्या. तुमच्या ऑफिस मधले तुमचे सहकारी कामासाठी का होईना पण रोज हसून बोलतात त्यांना तिळगुळ द्या. सर्वात महत्वाचे तुमचे शेजारी न बोलता न सांगता तुमच्या वर कायम लक्ष ठेवतात त्यांना तिळगुळ घ्या कारण त्यांच्या गोड असण्यावरच तुम्ही ऑफिस मध्ये निश्चिंत असता.
फक्त social media वर शुभेच्छा देण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा भरणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा शब्दांचा स्नेह आणि गोडवा देऊया आणि खऱ्या अर्थाने मकरसंक्रांत या सणातील नात्यांमधील सकारात्मक संक्रमण करूया.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं मग ते व्यक्ती सोबत असो की समाज राष्ट्र किंवा देशा सोबत एक नागरिक म्हणून असणार असो त्या मध्ये असणारा स्नेह आणि गोडवा वाढवूया त्यासाठी स्वतः पासून सुरुवात करूया!!!!!
मकर संक्रांतीच्या स्नेहमयी आणि गोड गोड शुभेच्छा !!
Monday, 4 December 2017
Sunday, 19 November 2017
Tuesday, 10 October 2017
Wednesday, 13 September 2017
नात्यांमधली भावनिक acidity .............!!!!
नात्यांमधली acidity .............!!!!
ऐकायला थोडं
चुकीचं वाटेल..........मला सुद्धा
लिहताना .......विचार करताना
थोडं कठीण च
वाटलं होतं.पण
आज एक मैत्रीण सहज म्हणाली "तो म्हणाला
acidity सारख नात नको आहे मला". ऐकून थोडं हसायला
आलं पण ते
एक वाक्य मनात
घर करून गेलं.
मना सारख
जेवण बनवून जेवलो
तरी acidity होते तेव्हा
अस वाटत उगाच
जेवलो एवढं.मग
आधी आवडीचं जेवलेलं जीरलेलं नसतं
आणि नंतर ही
मना सारख खाता
येत नाही...कारण
acidity!!!
आयुष्यात असंख्य नाती जपताना असंच काहीसं होत असत अस नाही का वाटत?....प्रत्येक नात आपल्या जागी योग्यच असत पण आपण ते कोणत्या दृष्टीने घेतो त्यावर ते अवलंबून असत. जेवण बनवता घेतलेल्या सर्वोत्तम मेहनती वर एक acidity पाणी फिरवते. अगदी तसच नात जुळतात कितीही काळजी घ्या पण जपताना अविसश्वासाची acidity नात टिकू देत नाही.
कधी कधी घरी खूप छान जेवण असूनही आपण मात्र बाहेर जेवायला जातो..अर्थात गरज नसते पण मस्ती असते.अश्या वेळी जेव्हा acidity होते तेव्हा आपण च म्हणतो उगाच बाहेर गेलो..
आयुष्यात आहेत ती नाती न जपता नवीन नाती जोडताना असच काहीस होत अस नाही का वाटत????
स्वतःच्या भावना जपताना दुसर्याला ही भावना आहेत याचा विचार नाही केला तर ही कृतघ्नतेची भावनांची acidity तुम्हाला अस्वस्थ करते...
कधी कधी जेवणच रुचकर नसत पण तुम्ही मात्रमनापासून पासून जेवता तेव्हा सुद्धा acidity होऊ शकते मात्र तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही कारण तुम्हाला मनापासून जेवायचं असतं....अगदी तसंच काही नात्यानं मध्ये स्वतःला कितीही त्रास झाला तरीही तूम्ही दाखवत नाही कारण तुम्हाला ते मनापासून हवं असत....
कधी कधी आपण आपल्या मनासारखं नाही पण दुसर्याला आवडेल अस जेवण बनवतो किंवा त्याच्या
आवडीच ऑर्डर करतो. पण तरीही आपण मनापासून आस्वाद घेतो. कारण तिथे समोर कोण आहे हे
महत्वाच असतं. अगदी तसच.... काही नाती तुम्ही तुमची नाही पण समोरच्याची आवड निवड बघून
जोडता...आणि ती नाती जपताना स्वतः पेक्षा समोरच्याची जास्त काळजी घेता...इथे दुखः...भीती...परकेपणा
दुर्लक्ष अश्या भावनांच्या acidity चा त्रास झालाच तरी जाणवत नाही...
काही माणसांना कधीच acidity होत
नाही कारण त्यांना स्वतःची काळजी
स्वतः घेता येते...जेव्हा
तुमची काळजी दुसर्याने घ्यावी अशी
अपेक्षा असेल किंवा परिस्थिती असेल तेव्हा तुम्हाला ही नात्यानं मधली परावलंबीत्वाची acidity होते कारण
जेव्हा तुमची काळजी
घेणारी व्यक्ती थोडं
जरी कमी-जास्त वागली तरी
त्रास तुम्हालाच होतो....तीला नाही!
तुम्हाला माहीतच
असेल कायमच acidity होणाऱ्या माणसांना डॉक्टर काही
गोष्टी कायमच्या बंद
करायला सांगतात...अगदी
काही नात्यानं मध्ये
जेव्हा कधीही न
संपणारी अंतरे निर्माण होतात तेव्हा
त्यांना पूर्णविराम द्यावाच लागतो..आणि तेव्हा होते घटस्पोट BREAK UP वादविवाद
भांडण इर्शा यांची ACIDITY......आणि
मग तेव्हा तुम्हाला कितीही वाटत
तरी तुम्ही ते
नात टिकाऊ शकत
नाही म्हणूनच आधी
पासूनच काळजी घ्या
कारण बंद झालेली
खाती पुन्हा उघडता
येत नाहीत.... किंबहुना उघडूच नये....!!!
असंख्य भावना एकत्र जपताना मनाची होणारी अस्वस्थता..चलबिचल...ओढाताण आपण टाळू
शकत नाही....पण त्यातून होणारा त्रास हा असह्य होतो तेव्हा मग दही भातावर भागवून
किंवा ENO पिऊन जशी acidity दूर करावी लागते ना तसच नात्यामध्ये हि प्रेम, विश्वास ,भेट ,संवादाचा
ENO च परिणामकारक असतो....
भावनांची acidity अधून मधून होणारच पण
तेव्हा स्वतःला आणि समोरच्याला सावरायला माणुसकीचा ENO कायम सोबत ठेवावा लागेल.....तेव्हाच
तुमच्या नात्यामधल निरामय स्वास्थ्य जपू शकाल....आणि या नात्यांमधल्या भावनिक
ACIDITY पासून स्वतःला आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला दूर ठेवू
शकाल!!!!
Subscribe to:
Posts (Atom)