आयुष्यात
काहीच हरवलं नाही आणि गमावलं नाही अस कोणीच नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात
अस काहींना काही असतंच जे हरवलंय किंवा गमावलय.
हरवलेले
शोधावं लागत आणि गमावलेलं
मिळवाव लागत.
हरवलेले
शोधून मिळेल ही कदाचित कारण जे हरवलंय ते जर दुसर कोणाला मिळालं असेल तर तो
तुम्हाला देईल ही कदाचित किंवा जर कोणाला मिळालं नसेल तर ते जिथे हरवलंय तिथेच
तुम्हाला मिळेल..पण गमावलेल पुन्हा मिळेल का??
ज्याने
गमावलंय त्याला ते मिळवायचं का यावर अवलंबून आहे असं म्हणता येणार नाही..कारण जे
गमावलंय ते दुसर कोणाला मिळाल असेल तर तुम्हाला पुन्हा नाही मिळणार...आणि
गमावलेल्याला त्याचं दुःख नसेल तर ते तुम्हाला मिळणार सुद्धा नाही.
......पण कधी कधी हरवलेलं खूप
दिवस मिळालं नाही की आपण विसरून जातो किंवा तसंच काही तरी नवीन घेतो पण तरिही जे
हरवलंय ते विसरणं सोप्प नसतं ना?
अगदी
तसंच गमावलेल सुद्धा पुन्हा मिळवता नाही आलं म्हणून आपण नवीन तसंच काही तरी शोधतो
आणि समजावतो स्वतःच्या मनाला .....मग ती गमावलेली नोकरी असो की माणस त्या शिवाय
जगायचं म्हणजे तडजोड करतोच आपण!!!!
आपले
१००० रु. हरवले म्हणून आपल्याला कोणी २००० दिले तरी आपण आपले १००० रु. नाही विसरू
शकत. अगदी तसच आयुष्यात काही माणस आपण आपल्या किंवा त्यांच्या समज -गैर समज यामुळे
गमावतो पण त्यांची कमी भरून काढणार कोणीही आल तरी त्यांची कमी जाणवतेच.
कधी
कधी गमावलेल्या किंवा हरवलेल्या वस्तू किंवा माणसं त्या पेक्षा दुपट्ट काही तरी
आयुष्यात येत आणि जून सार काही आपण विसरतो.पण आयुष्याच्या एका दुसऱ्या वळणावर ते
पुन्हा भेटतात तेव्हा प्रश्न असतो की स्वीकारावं की नाही ??
कारण
मधल्या काळात झालेल्या बदला सहित त्यांना स्वीकारणं खूप कठीण असतं. जस कि वस्तू
जुन्या झालेल्या असतात ..….म्हणून वाटत हरवलेलं असो की गमावलेल पुन्हा मिळावं पण
जस च्या तस! जे कदाचितच शक्य असेल.
आपण फक्त
वस्तू किंवा माणसच गमावतो असं नाही .कधी पानिपतच्या युद्धात विश्वास गमावलाय....तरी
नटसम्राट मध्ये माणुसकी हरवलीये.....कुठे नात्यांच्या गर्दीत भावना हरवल्यात तर
कुठे रुक्ष जीवनात डोळ्यातले अश्रू हरवलेत...!!!!
म्हणून
वाटत जरूर काही तरी हरवाव जे पुन्हा पुन्हा शोधावस वाटेल आणि.. नकळत – कळत गमवाव काहीतरी
आणि जे पुन्हा पुन्हा मिळावसं वाटेल अगदी जसच्या तस.....!!!
तुमच्या आयुष्यात अस काही आहे का जे हरवून मिळालय? किंवा गमावून मिळालंय??
No comments:
Post a Comment