Friday, 18 August 2017

काही नात्यांना नाव नसत .......पण त्यातच सार काही असतं .........




काही गोष्टी कराव्या लागत नाही त्या आपोआप होतात
जस प्रेम....पण नक्की प्रेम असतं तरी काय?????
couple images साठी प्रतिमा परिणाम 
पाहता क्षणीच प्रेमात पडलो अस नाही पण आता जेव्हा जेव्हा तुला पहाते तेव्हा मनाची होणारी चलबिचल
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही............

तू नाही दिसलास तर तुला विसरेन अस नाही पण तू जेव्हा जेव्हा दिसत नाहीस तेव्हा होणारी तगमग रोखता येत नाही
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही..........

तू काही तरी भेट द्यावीस मग मी खूप आनंदी व्हावं अस काही नाही पण तुझ्या छोट्या छोट्या शुभेच्छा नी मिळणारा जिव्हाळा हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही............

couple images साठी प्रतिमा परिणामतू रोज भेटावस काही तरी बोलावस काही तरी सांगावस अस काही नाही ...पण न बोलताच मला आणि तुला सार काही कळावं हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही .............

एकमेकांच्या सुख दुःखात सोबत असणारच अस नाही पण जेव्हा नसणार तेव्हा उणीव भासेलच
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही......

भांडण रागावण हे असायलाच हवं पण त्या नंतर एकमेकांच्या समोर येऊन ही स्मित हास्य देणं
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही...

Long drive picnic हे तर सगळेच करतात पण कुठे तरी एकांतात बसून न पाहिलेल्या ठिकाणा वर तासनतास गप्पा मारण हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही...
couple images साठी प्रतिमा परिणाम 
तुला आवडणारी थंडी असो की न आवडणारा पावसाळा पण साऱ्या ऋतू मध्ये तूझी सोबत असावी असं नकळत मागणं
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही….

देवा कडे काही मागताना नेहमी स्वतःचा विचार सगळेच करताना पण तिथे माझ्या आधी तुझ्या साठी मागणं
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही……..

भेट मिनिटांची असो की तास भराची पण कितीही बोलुन काही तरी उरतच जे उद्या भेटल्यावर बोलून सांगायचं असत
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही……….
couple images साठी प्रतिमा परिणाम 
नाव गाव आवडी निवडी विचारून सगळेच नात जोडतात पण नात जोडून हे सारं काही कळणं

स्वतः मधला मी तर प्रत्येक जण जपतोच पण तुझ्या आयुष्यातली “मी” आणि माझ्या आयुष्यातला “तू” जपण
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही..............     

अपेक्षा शपथा देवाण घेवाण हे असतंच पण कोणत्याही बंधना शिवाय कायम सोबत राहावं
couple images साठी प्रतिमा परिणामहे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही........

सार काही देऊन हि खूप काही द्यायचं उराव ...काहिही न घेता खूप काही मिळाव
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही...........