काही गोष्टी
कराव्या लागत नाही त्या आपोआप होतात
जस प्रेम....पण
नक्की प्रेम असतं तरी काय?????
पाहता क्षणीच
प्रेमात पडलो अस नाही पण आता जेव्हा जेव्हा तुला पहाते तेव्हा
मनाची होणारी चलबिचल
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही............
तू नाही दिसलास
तर तुला विसरेन अस नाही पण तू जेव्हा जेव्हा दिसत नाहीस तेव्हा
होणारी तगमग रोखता येत नाही
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही..........
तू काही तरी भेट
द्यावीस मग मी खूप आनंदी व्हावं अस काही नाही पण तुझ्या छोट्या छोट्या शुभेच्छा नी मिळणारा
जिव्हाळा हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही............
तू रोज भेटावस
काही तरी बोलावस काही तरी सांगावस अस काही नाही ...पण न बोलताच मला आणि तुला सार
काही कळावं हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही .............
एकमेकांच्या सुख
दुःखात सोबत असणारच अस नाही पण जेव्हा नसणार तेव्हा उणीव भासेलच
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही......
भांडण रागावण हे
असायलाच हवं पण त्या नंतर एकमेकांच्या समोर येऊन ही स्मित हास्य देणं
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही...
Long
drive picnic हे तर सगळेच
करतात पण कुठे तरी एकांतात बसून न पाहिलेल्या ठिकाणा वर तासनतास गप्पा मारण हे
प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही...
तुला आवडणारी
थंडी असो की न आवडणारा पावसाळा पण साऱ्या ऋतू मध्ये तूझी सोबत असावी असं नकळत
मागणं
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही….
देवा कडे काही
मागताना नेहमी स्वतःचा विचार सगळेच करताना पण तिथे माझ्या आधी तुझ्या साठी मागणं
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही……..
भेट मिनिटांची
असो की तास भराची पण कितीही बोलुन काही तरी उरतच जे उद्या भेटल्यावर बोलून
सांगायचं असत
हे प्रेमा शिवाय
बाकी काही असू शकत नाही……….
नाव गाव आवडी
निवडी विचारून सगळेच नात जोडतात पण नात जोडून हे सारं काही कळणं
स्वतः मधला मी तर प्रत्येक जण जपतोच पण
तुझ्या आयुष्यातली “मी” आणि माझ्या आयुष्यातला “तू” जपण
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही..............
अपेक्षा शपथा
देवाण घेवाण हे असतंच पण कोणत्याही बंधना शिवाय कायम सोबत राहावं
सार काही देऊन हि खूप काही द्यायचं उराव ...काहिही
न घेता खूप काही मिळाव
हे प्रेमा शिवाय बाकी काही असू शकत नाही...........
Awesome
ReplyDeleteOhhh mast yaar 😍😍😍😍
ReplyDeleteOhhh mast yaar 😍😍😍😍
ReplyDeleteNice👌
ReplyDeleteNice👌
ReplyDeleteAwsome
ReplyDeleteJust amazing
ReplyDelete